अकोला, अहमदनगरनंतर त्रंबकेश्वरमध्ये दंगलीची परिस्थिती? जमावाकडून बळजबरीनं घुसण्याचा प्रयत्न, तर पोलिसांनी…नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा वाद पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मिटला. मात्र त्यांनतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग देवस्थानने पत्र दिल्याचे समजते आहे.

    नाशिक : अकोला, अहमदनगरच्या (Ahmednagar) शेवगाव येथे दोन गटात दगडफेक आणि हाणामारी दंगलीनंतर आता नाशिमधील त्र्यंबकेश्वर येथील (Trimbakeshwer) मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwer Mandir) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी मंदिर प्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच येथे देखील दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहयला मिळत आहे. त्यामुळं पोलीस सतर्क झाले असून, पोलीस जमावबंदीचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

    नेमकं काय घडलं?

    दरम्यान, 13 मे (शनिवारी) रोजी काही टोळक्याने मंदिरात जोरदबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक व मंदिर प्रशासन यांनी वाद घालणाऱ्या जमावाला अडवले. यावेळी सुरक्षारक्षक व जमावामध्ये मोठा वाद झाला. या घटनेनंतर भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा वाद पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मिटला. मात्र त्यांनतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग देवस्थानने पत्र दिल्याचे समजते आहे. तसेच हा जमाव कुठून आला. यामागे कुणाचा हात होता, याचा पोलीस शोध घेताहेत.

    पोलीस कारवाई करणार?

    सध्या राज्यात अकोला, शिवगाव या ठिकाणी दंगली झाल्याच्या घटना ताज्या असातना, आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. घडलेली घटना गंभीर असल्याने यात कोण लोक होते? त्यांना मंदिरात प्रवेश का करायचा होता? अशा स्वरूपाची माहिती मंदिर प्रशासनाने पोलिसांकडून मागितली आहे. त्याचबरोबर संबंधितांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान मंदिरात ज्या लोकांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला, संबंधित लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही.