शिवसेना सत्तेतही आणि विरोधी पक्षातही? विधिमंडळात आणखी नवा पेच

आपला गट हीच खरी शिवसेना असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता ताब्यात घेतली. तर, शिवसेनेच्या उरलेल्या १५ आमदार यांनी त्याला आक्षेप घेत विधानसभा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.

  • विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर शिवसेनेचा दावा

महेश पवार, मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला विधिमंडळातील आपला पक्ष वाचविण्याचे आव्हान समोर आहे (Shiv Sena is facing the challenge of saving its party in the legislature). एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister Of Maharashtra) शपथ घेतली तर दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात संख्याबळाच्या आधारावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार यांची निवड झाली(NCPs Ajit Pawar was elected as the Leader of Opposition in the Assembly). मात्र, आता विधान परिषदेत आपल्या पक्षाचा विरोधी पक्षनेते व्हावा यासाठी शिवसेना (ShivSena) प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपला गट हीच खरी शिवसेना असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता ताब्यात घेतली. तर, शिवसेनेच्या उरलेल्या १५ आमदार यांनी त्याला आक्षेप घेत विधानसभा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका राखून ठेवली आहे. त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला असला तरी खरा शिवसेना गट कोणता याची निश्चिती झालेली नाही.

विधानसभेत संख्याबळ घटल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्याकडे आले. मात्र, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेने आपला दावा सांगितला आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षे ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेलाच मिळायला हवे, असे शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही या पदावर दावा करणार आहोत, असे सांगतानाच विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार यावर भाष्य करणे मात्र त्यांनी टाळले. विधानपरिषद निवडणुकीदरम्यान जी आमच्यासोबत होती ती आता वेगळ्या प्रवाहात गेले आहेत, असे ते म्हणाले.

शिवसेना विरुद्ध शिवसेना

शिंदे गटाने शिवसेनेवर आपला दावा सांगितला आहे. शिंदे यांची शिवसेना सत्तेत जाऊन बसली आहे. तर, विधानपरिषदेतील शिवसेना आमदार यांनी विरोधी पक्षात बसण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे एकाच पक्षाची सत्ता आणि विरोधी पक्ष नेता असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.