मित्राच्या बायकोला का बघतोय असा जाब विचारल्यानंतर दोघांवर केला हल्ला

मागील अनेक दिवसांपासून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात भर दिवसा होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही शुल्लक कारणावरून हल्ला केल्याच्या घटना सतत घडत आहे.

    कल्याण: मागील अनेक दिवसांपासून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात भर दिवसा होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही शुल्लक कारणावरून हल्ला केल्याच्या घटना सतत घडत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात असे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तरीसुद्धा हल्ला, मारामारी, खून हे प्रकार सतत घडत आहेत.

    कल्याण रेल्वे स्टेशन वर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर बुधवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास काही लोकं उभे होते .एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता .हे बघून दिवा खेतकर या २८ वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला विचारले की तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय दिवा याने फक्त एवढेच विचारलं ,समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की आपल्या जवळ असलेला धारदार शास्त्र काढून दिवा याच्यावर हल्ला करण्यात आला. दिवाच्या मानेवर जखमा झाल्या आहेत.एवढे नाही तर यावेळी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेला राजू राऊळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केला .राजू यांना देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत .कल्याण जी आर पी ने गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली आहे.

    अरुण चंदन नगर खडवली येथे हा व्यक्ती राहतो.अरुण याला अटक करत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे .मित्राच्या बायकोला का बघतोय फक्त एवढे विचारले याचा राग इतका अनावर झाला की त्या व्यक्तींने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला .कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली .कल्याण जी आर पी पोलिसांनी अरुण कांबळे या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत .