भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातानंतर, शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले रात्री-अपरात्री…

गोरे व त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. गोरे यांची गाडी पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून जात होती, यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी खोल 30 फूट दरीत कोसळली. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.

    मुंबई– आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात होऊन, त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आता भाजपाचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला शनिवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. रस्त्यावर गाड्या नसताना माझ्या मुलाच्या गाडीचा अपघात कसा झाला? हा अपघात नसून घातपाताचा सशंय जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. गोरे व त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. गोरे यांची गाडी पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून जात होती, यावेळी चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी खोल 30 फूट दरीत कोसळली. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.

    दरम्यान, जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर या अपघाताबात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या अपघाताबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रात्री-अपरात्रीचा प्रवास सर्वांनी टाळायला हवा, पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, त्यामुळं शक्यतो रात्रीचा प्रवास टाळायला हवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

    हा अपघात नसून, घातापात असल्याचं गोरे यांच्या वडिलांनी म्हटलं होतं, यावर मंत्री शंभूराज देसाई प्रतिक्रिया देताना म्हटले की, बोलण्याच्या ओघात किंवा अनावधानानं त्यांच्या चालकाकडून चूक घडली असेल पण असं काहीही नाही. ते स्वतः झोपेत असतानाच हा अपघात घडला, पण आता त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. दरम्यान, आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कुमार गोरे यांचा अपघात नसून घातपात आहे, असा संशय त्यांच्या वडिलांनी उपस्थित केला होता. मात्र, हा घातपात नसून अपघातच आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तर घातपात असेल तर, याची रितसर चौकशी करण्यात येईल असं आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.