मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर, आता एकनाथ शिंदेही पत्रकार परिषद घेणार

उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यांनी मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीय, पण मला समोर येऊन बोला असं आपल्या भाषणात मुख्मंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यानंतर आता बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे सुद्धा थोड्याच वेळात पत्रकार परिषद (Eknath shinde press conference) घेणार आहेत.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. दरम्यान आता या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यांनी मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीय, पण मला समोर येऊन बोला असं आपल्या भाषणात मुख्मंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान, त्यानंतर आता बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे सुद्धा थोड्याच वेळात पत्रकार परिषद (Eknath shinde press conference) घेणार आहेत.

    दरम्यान, एकनाथ शिंदेही सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 40 आमदारांचा आपणाला पाठींबा असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावलेंची नियुक्ती केल्याची माहिती शिंदेंनी ट्विटरवरुन दिली आहे.

    मंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलंय त्याला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार का, किंवा मला समोरुन येऊन बोला अशी मुख्यमंत्र्यांनी साद घातली आहे त्याला एकनाथ शिंदे उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.