Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

दसरा मेळाव्याला वाजत गाजत या...पण शिस्तीनं या, परंपरेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल असा आमचा विश्वास आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. बाळासाहेबांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत, सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचं भवितव्य ठरवणारा असेल, असं उदधव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

    मुंबई : शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. शिवसेनेना (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली होती. मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली होती, मात्र आता आज हायकोर्टात (Bombay high court) सुनावणी पार पडली. दरम्यान, दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्याच दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाला धक्का बसला असून, आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार असून, उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, यावर प्रतिक्रिया दिली. (shivsena chief udhav thackeray press conference)

    दरम्यान, दसरा मेळाव्याला वाजत गाजत या…पण शिस्तीनं या, परंपरेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल असा आमचा विश्वास आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. बाळासाहेबांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत, सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचं भवितव्य ठरवणारा असेल, असं उदधव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विजय आम्ही पुढेही मिळवू, मेळाव्यास गुलाल उधळत या, पण शिस्तीनं या, आता कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची, आज लोकशाहीचा विजय झाला, शिवसेनेत दोन गट नाही, शिवसेना आता आणखी वाढणार, कायदा व सुव्यवस्था पालिका नाकारु शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले.