Power should not go to the head; Devendra Fadnavis warns Mahavikas Aghadi government on Kangana and Arnab issue

कोर्टाच्या निर्णयानंतर आता विरोधकांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी माध्यमांशी बोलताना, दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, तसेच आमच्याकडून शिवसेनेला शुभेच्छा आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे, आणि हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच होणार आहे, कोर्टानं शिवसेनेला दसरा मेळाव्यास परवानगी दिली आहे. दसरा मेळावा (Dasara Melava) यावर्षी होणार की नाही? याबाबद राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. शिवसेनेना (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टात (Bombay high court) सुनावणी पार पडली. दरम्यान, दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्याच दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यामुळं शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार असून, उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा आवाज घुमणार आहे.

    दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर आता विरोधकांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी माध्यमांशी बोलताना, दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, तसेच आमच्याकडून शिवसेनेला शुभेच्छा आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.