खाद्य तेलानंतर आता किरकोळ बाजारात टोमॅटो आणि डाळीही स्वस्त होणार

किरकोळ बाजारात खाद्य तेलाच्या (Edible products) किंमतीत घट झाल्यानंतर आता डाळी, टोमॅटोच्या किंमतीतही घट झाली आहे. देशात आठवड्याभरात खाद्य तेल, टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घट (Prices decreases of edible oil, tomato) झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे. केंद्र सरकारने (Central Government) खाद्य वस्तूंच्या किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून महागाईमुळं सामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे. गॅस, पेट्रोल डिझेल तसेच दैनंदिन वस्तुच्या किंमती दिवसागणिक झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळं जगायंच कसं हा जनतेसमोर प्रश्न आहे. मात्र आता एक सर्वसामान्यासाठी दिलासादायक तसेच आनंदाची बातमी समोर येत आहे. किरकोळ बाजारात खाद्य तेलाच्या (Edible products) किंमतीत घट झाल्यानंतर आता डाळी, टोमॅटोच्या किंमतीतही घट झाली आहे. देशात आठवड्याभरात खाद्य तेल, टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घट (Prices decreases of edible oil, tomato) झाल्याचा दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने केला आहे. केंद्र सरकारने (Central Government) खाद्य वस्तूंच्या किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे, या आकडेवारीनुसार टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घट झाल्याचे पाहयला मिळते. या स्वस्ताईमुळं सामान्यांना दिलासा मिळाला असून, गृहिणीनं समाधान व्यक्त केलं आहे.

    किरकोळ बाजारात तेलाच्या किंमतीतील घसरणीनंतर आता डाळी व टोमॅटो सुद्धा स्वस्त होणार आहे. दरम्यान, पाम तेलात महिन्याभरात ४ रुपयांनी घट झाली असून जून महिन्यात १८२.४० रुपये पाम तेल होते, या किंमतीत घसरण होऊन आता १७८.०१ रुपयांवर पाम तेलाची किंमत आली आहे. तर, सोयाबीन तेलाच्या भावात २.२९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. केंद्र सरकारने खाद्य वस्तूंच्या किंमतींची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे, या आकडेवारीनुसार टोमॅटो आणि डाळींच्या किंमतीत घट झाल्याचे पाहयला मिळते. वनस्पतीच्या तेलाचे भाव १.९३ टक्के घसरले आहे. तसेच, सूर्यफूल तेलाचा भाव ३.९३ टक्क्यांनी कमी झाला आहे.