प्रवाश्यांच्या खिशाला लागणार कात्री ? इंधन दरवाढीनंतर रिक्षा – टॅक्सी चालकांची भाडेवाढीची मागणी

इंधन दरवाढ (Fuel Price Hike) आणि इंधन गॅसवाढीमुळे रिक्षा - टॅक्सी चालकांनी भाडेवाढीची (Auto And Taxi Fare Hike Demand) मागणी केली आहे.

    मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर(Fuel Price Hike) सीएनजी आणि पीएनजीतही वाढ झाली. त्यामुळे रिक्षा – टॅक्सी चालकांनीही भाडेवाढीची मागणी (Auto And Taxi Fare Hike Demand) केली आहे. सध्या रिक्षाचे भाडे २१ रुपये आहे तर टॅक्सीचे २५ रुपये आहे. त्यात पाच रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच एसटी संपात व्यस्त असलेल्या परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना आता नव्या प्रश्नाकडे पाहावे लागणार आहे.

    टॅक्सीचे किमान भाडे ३० रुपये, रिक्षाचे २५ रूपये करा
    सीएनजी महागल्याने चालकांनी भाडेवाढ करत टॅक्सीचे किमान भाडे ३० रुपये तर, रिक्षाचे भाडे २५ रूपये करावे, असे चालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, रिक्षा – टॅक्सी भाडेवाढ झाल्यास प्रवाश्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईत सीएनजीचे भाव वाढल्याने रिक्षा – टॅक्सी चालक नाराज आहेत. त्यामुळे चालकांनी टॅक्सी दरात ५ रूपये वाढ तर, रिक्षाचे किमान भाडे २५ रूपये करण्याची मुंबई – टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

    यापूर्वी २०२१च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरुन २१ रुपये तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये झाले होते. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू करण्यात आली. ही भाडेवाढ १ मार्चपासून लागू करण्यात झाली होती. आता इंधन दरवाढ आणि इंधन गॅसवाढीमुळे पुन्हा भाडेवाढीची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला १८ रुपयांऐवजी २१ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला १४.२० पैसे मोजावे लागणार आहेत.