तहसिलदार लाचेच्या जाळ्यात अडकल्यानंतर वाळू घाटावर लवकरच १४४ कलम…

बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कठोर पावले उचलली आहेत. वाळू उपशाच्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथून कोणत्याही स्थितीत बेकायदा वाळू उपसा व वाहतुक होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. तसेचं वाळू घाटावर १४४ कलम जमावबंदी आदेश लावण्याच्या महसूल विभागाने हलचाली सुरू केल्या आहेत.

    लातूर : मांजरा व तेरणा नदीपात्रातील काही ठराविक घाट महसूल विभागाच्या निशाण्यावर आले असून तालुक्यातील संवेदनाशील असलेल्या वाळू घाटावर १४४ कलम जमावबंदी आदेश लावण्याच्या महसूल विभागाने हलचाली सुरू केल्या आहेत. यामुळे वाळू माफीयाचे धाबे दणाणले असून वाळूमाफीयाचा बिमोड करण्यासाठी महसूल विभागाने आता अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरवात केल्याचे दिसते.

    जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात, सध्या नदीपात्रात पाणी असल्याने बोटीद्वारे वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे करून ठेवण्यात आले आहेत. याबाबत अनेकवेळा कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

    दरम्यान त्यामुळे बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कठोर पावले उचलली आहेत. वाळू उपशाच्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथून कोणत्याही स्थितीत बेकायदा वाळू उपसा व वाहतुक होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी उपविभागीय आधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

    महसूल विभागाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मांजरा व तेरणा नदीपात्रातील संवेदनाशील वाळू घाटाची माहीती मागवण्यात आली असून लवकरच या ठिकाणी १४४ कलम लागू जमावबंदी आदेश लागू करण्याच्या हालचाली महसूल विभागाने सुरू केल्या आहेत.