राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाग्रस्त ?

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ( Governor Bhagat singh Koshyari) यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Cm Uddhav Thackeray Corona Positive) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ( Governor Bhagat singh Koshyari) यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Corona Positive) हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित राहाणार आहेत, असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आर-पीसीआर टेस्ट निगेटीव्ह तर अँटिजन टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे.

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते व्हर्च्युअली मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतील. महाराष्ट्र अस्थिर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमलनाथ यांच्याशी बोलले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत सरकार बरखास्तीबाबत चर्चा होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण ताकदीने चालेल. त्याचं नेतृत्त्व उद्धव ठाकरे करतील.