photo credit - social media
photo credit - social media

सामन्यादरम्यान अचानक गुन्नू बेशुद्ध होऊन खाली पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला मध्य रेल्वे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कधी लग्नात नाचताना (Dancing) तर कधी बॅडमिंटन (Badminton) खेळताना लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. बॅडमिंटन खेळताना अचानक मृत्यू झाल्याची घटना नुकतीच हैदराबादमध्ये घडली होती. (Man Died While Paying Badminton) आता अशीच घटना नागपूरमध्ये घडली आहे.  बॅडमिंटन खेळणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. गुन्नू धर्मू लोहारा (वय 49)असे मृत व्यक्तीचे नाव असुन सोमवारी सकाळी ते नागपुरच्या पाचपावली परिसरात मित्रासोबत बॅडमिंटन खेळत होते.  त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

नेमकं काय घडलं

सामन्यादरम्यान अचानक गुन्नू बेशुद्ध होऊन खाली पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला मध्य रेल्वे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. गुन्नू हा नागपूरच्या यादव नगरचा रहिवासी होता. सध्या गुन्नू यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून, त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये कधी बॅडमिंटन खेळताना एखाद्याचा मृत्यू झाला, तर कधी नाचत असताना अचानक हल्ला झाला आणि त्याने जगाचा निरोप घेतला.

हैदराबादमध्येही बॅडमिंटन खेळताना व्यक्तिचा मृत्यू

अवघ्या 15 दिवसांपूर्वी 28 फेब्रुवारीला हैदराबादमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. सिकंदराबादच्या लालपेट येथे बॅडमिंटन खेळणाऱ्या एका व्यक्तीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये 38 वर्षीय श्याम यादव बॅडमिंटन कोर्टवर पडलेला दिसला. कुटुंबीयांनी सांगितले की, श्याम रोज ऑफिसमधून परतल्यानंतर बॅडमिंटन खेळायला जायचा. 

लग्नात आलेल्या पाहुण्याचा मृत्यू

 हैदराबादमधून काही दिवसापुर्वी लग्नसंमारंभात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात लग्नसमारंभ होता. घरात संगीत वाजत होते. वरात अंगणात बसले होते. हळदी समारंभ चालू होता. आनंदाचे वातावरण होते. एका व्यक्तीच्या लग्नापूर्वी येथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी एक व्यक्ती वराला उबटान लावण्यासाठी आली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळात तो चेहऱ्यावर पडला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले.