After impounding the vehicle of banned Gutkha, the police seized the valuables worth around seven and a half lakhs

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने सापळा रचून वाहन अडविले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली. त्या वाहनामध्ये २ लाख २४ हजार ९६० रूपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधित पान मसाला आढळून आला. त्यासोबतच चार चाकी वाहन ज्याची किंमत पाच लाख रुपये असा एकूण ७ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याने जप्त केला आहे.

    पुसद : वसंत नगर पोलीस स्टेशनच्या (Vasant Nagar Police Station) हद्दीत येत असलेल्या महाविद्यालयासमोर एका चार चाकी वाहनातून जात असलेला प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा पकडला. यामध्ये ७ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ ऑगस्ट २०२२ रोजी सांयकाळच्या सुमारास केली.

    यवतमाळ चे अन्न व सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त गोपाल विनायक माहोरे यांनी तक्रार दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३७,७७७७ मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पान मसाला व तंबाखू जन्य पदार्थांचा माल घेऊन काही इसम जात आहे‌.

    त्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (Department of Food and Drug Administration) अधिकाऱ्याने सापळा रचून वाहन अडविले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली. त्या वाहनामध्ये २ लाख २४ हजार ९६० रूपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधित पान मसाला आढळून आला. त्यासोबतच चार चाकी वाहन ज्याची किंमत पाच लाख रुपये असा एकूण ७ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याने जप्त केला आहे. आरोपी विरोधात वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये (Vasant Nagar Police Station) गुन्हे दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.