
स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रुजविण्याचे महत्वाचे काम काँग्रेस पक्षाने केले असून देशातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करणे महत्वाचे असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त येथे केले.
तळेगाव दाभाडे : स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रुजविण्याचे महत्वाचे काम काँग्रेस पक्षाने केले असून देशातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करणे महत्वाचे असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त येथे केले.
मावळ तालुका काँग्रेसच्यावतीने आगामी निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, अॅड. दिलीप ढमाले, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, महिलाध्यक्षा प्रतिमा हिरे, देहुरोड अध्यक्ष हाजिमंलग मारिमत्तु, विशाल वाळुंज, राजीव शिंदे, पवन गायकवाड, राजेश वाघोले यांच्यासह माऊली काळोखे, राजेंद्र पोळ, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे काळात भारताचे नावलौकिक जगभर पसरला होता. मात्र भारतीय जनता पक्ष हा जगात भारताची चुकीची प्रतिमा निर्माण करीत आहे, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला. सुत्रसंचालन रोहिदास वाळुंज यांनी केले. आभार राजेश वाघोले यांनी मानले.
देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल
सावंत म्हणाले, सध्या देशात लोकशाही नष्ट करण्याचे काम होत असून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. तर देशातील विद्वान, शेतकरी, कामगार, यांचा आवाज दाबून टाकला जात आहे. तर बेरोजगारी वाढत आहे. याशिवाय जाती जातीत संघर्ष निर्माण केला जात आहे. काँग्रेस पक्षाने बळकट केलेली लोकशाही नष्ट करण्याचे काम होत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्ते संघटित होणे गरजेचे आहे.
संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल
देशाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यासाठी तयारी ठेवावी लागेल. सर्व सामान्यांना ताकद देण्याचे काँग्रेस पक्ष करु शकतो, असा विश्वास व्यक्त करुन ज्येष्ठ नेते रामदास काकडे म्हणाले, मजबूत संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान दिले पाहिजे.