
मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकी नंतर महत्त्वाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत, इंडिया आघाडीला यश येत असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार लहान लहान करप्शन करीत नाही. ते मोठे करप्शन करीत असते.
यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, ते नेहमी म्हणतात न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणारे आता भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडाले आहेत. त्यांचा भ्रष्टाचार लोकांना दिसण्यासारखा नाही. ते असा भ्रष्टाचार करतात लोकांना दिसू शकत नाही. परंतु, कॅगच्या अहवालात यांचा घोटाळा समोर आला. त्यानंतर आता पुन्हा नवीन भ्रष्टाचार पुढे आला आहे. हिंडनबर्गच्या अवहालातून पुन्हा एकदा अदानी ग्रुपचा मोठा घोटाळा पुढे आला आहे.