Girish-Bapat

गिरीश बापट यांना जाऊन चोवीसही तास होत नाही तोवर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मागील महिन्यात कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला.

पुणे : बुधवारी पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गिरीश बापट यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. गिरीश बापट हे 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. दरम्यान, बापटांच्या निधनानंतर कसब्यानंतर आता पुण्यात लोकसभेचीही पोटनिवडणूक (Pune Loksabha By-Election) होणार का? यावरुन राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत आहेत.

राजकीय वर्तुळाच चर्चा…

दरम्यान, गिरीश बापट यांना जाऊन चोवीसही तास होत नाही तोवर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मागील महिन्यात कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर चिंचवडमध्ये चुरशीचा सामना झाला. दरम्यान, गिरीश बापट यांच्या मृत्यूला चोवीस तास उलटत नाहीत, तोच मात्र त्यांच्या जागी लोकसभेची पोटनिवडणूक होणार का, यावर चर्चा रंगत आहे.

कोणाला उमेदवारी मिळणार?

बुधवारी पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर कसब्याप्रमाणे व पुण्यात बापटांच्या जागी लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती समोर येत आहे, दरम्यान, पोटनिवडणूक झाली तर कोणाला उमेदवारी मिळणार. यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहे. तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय, तर उमेदवारीवरुन देण्यावरुन वरिष्ठांमध्ये खलबतं सुरु असल्याचं समजते.