
आता किरीट सोमय्या यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे (Sandip deshpande) यांनीही मुंबई महानगर पालिकेवर लक्ष केले आहे. त्यांनी आज ट्विट करत मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा बाहेर काढणार असल्याच म्हण्टल आहे.
मुंबई : मुंबईत कोरोना काळात (bmc corona Scam) घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. कोरोना काळात स्थापन केलेली लाईफ लाईन मॅनेजमेंट ही कंपनी बोगस असून आता या प्रकरणी सर्वांची चौकशी होणार असल्याचही किरीट सोमय्या म्हणाले होते. आता किरीट सोमय्या यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे (Sandip deshpande) यांनीही मुंबई महानगर पालिकेवर लक्ष केले आहे. त्यांनी आज ट्विट करत मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा बाहेर काढणार असल्याच म्हण्टल आहे. तसेच 23 जानेवारीला या संबधीत पुरावे सादर करणार असल्याचही ते म्हणाले.
संदीप देशपांडेचा आरोप काय?
कोरोना काळात (Corona Pandemic) मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरुन नुकतचं ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना चौकशीलाही बोलवले होते. आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मुंबई महानगर पालिकेला लक्ष केले आहे. त्यांनी सांगितले की, एक व्यक्ती काही कागदपत्रे व पेन ड्राईव्ह शाखेत सोडून गेला. त्या पेन ड्राईव्हमधील डाटा पहिल्यानंतर मला धक्क बसला. त्यात कोरोना काळात विरप्पन गँगने मुंबईची कशी लूट केली आहे याचे पुरावे आहेत. हे पुरावे २३ जानेवारीला माध्यमांना देणार आहे.
वीरप्पन गॅंग चा करोना काळातला मोठा घोटाळा सोमवार दिनांक 23जानेवारी ला उघड करणार पुराव्या सहीत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2023
किरीट सोमय्यांनीही केलेत आरोप
मुंबईत कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी सुरू करण्यात आली होती. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसे ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून २०२० झाली होती. मात्र, कुठलाही अनुभव नसताना बोगस कंपनी काढल्याचा आरोप कंपनीवर सातत्याने करण्यात होते. या प्रकरणी तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असो किंवा संजय राऊत यांचे पार्टनर असो सर्वांनाच हिशोब द्यावा लागणार असा त्यांनी म्हण्टलं होतं.