नाशिकनंतर आता रायगडमध्ये मोठा अपघात; ‘या’ कारणामुळं घडला अपघात? कार-ट्रकची समोरासमोर धडक आणि…

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की...

  रायगड आज पहाटे पाचच्या सुमारास रायगडमधील गोरेगावमध्ये ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला, आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. नवीन वर्षात अपघाताच्या (Accident) घटना काही कमी होताना नाव घेत नाहीत, मागील आठवड्यात नाशिक (Nashik) येथे मोठी अपघाताची घटना ताजी असतानाच, आज पहाटे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (mumbai goa national highway) भीषण अपघात झाला आहे. रायगडमध्ये झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू (Nine dead) झाला आहे. तर, अपघातात लहान मुल बचावलं आहेत. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

  समोरासमोर धडक…

  दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरु केले आहे. या अपघातात ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे या कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहे.

  अर्धवट काम…

  कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही असंख्य अपघात झाले आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका अजूनही थांबताना दिसत नाही. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचं काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात होत असतात असं सांगितलं जातं.

  कणकवलीत सुद्धा अपघात

  दरम्यान, कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झालाय. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती.