राष्ट्रवादीच्या रामराजेनंतर भाजपच्या उमा खापरेंचेही मत बाद

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मतही बाद झालं आहे. दोन्ही बाद मतं बाजूला केल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. या बाद झालेल्या मतानंतर मतांचा कोटा आता कमी झाला आहे. दोन्ही मत बाद झाल्यानंतर मविआ आणि भाजप या दोघांनाही फटका बसला आहे.

    मुंबई – अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election result) मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे. मतमोजणीसुरू होण्याआधी राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचं मत बाद करण्याची मागणी केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मतही बाद झालं आहे. दोन्ही बाद मतं बाजूला केल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. या बाद झालेल्या मतानंतर मतांचा कोटा आता कमी झाला आहे. दोन्ही मत बाद झाल्यानंतर मविआ आणि भाजप या दोघांनाही फटका बसला आहे.