अकबरुद्दीन ओवीसी यांच्या वादानंतर, आजपासून औरंगजेबची कबर पर्यटकांना पाहण्यासाठी बंद

औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळं मोठं वातावरण तापले होते, तसेच ऐकमेकांवर टिका टिपण्णी करण्यात येत होती. अखेर यावर आता एक तोडागा काढण्यात आला आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाने बुधवारी दुपारनंतर काढला आहे. त्यामुळं आता औरंगजेबची कबर आगामी काळात पर्यटकांना पाहता येणार नाही.

    खुलताबाद : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली आहे, तेव्हापासून औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळं मोठं वातावरण तापले होते, तसेच ऐकमेकांवर टिका टिपण्णी करण्यात येत होती. अखेर यावर आता एक तोडागा काढण्यात आला आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाने बुधवारी दुपारनंतर काढला आहे. त्यामुळं आता औरंगजेबची कबर आगामी काळात पर्यटकांना पाहता येणार नाही.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जावून पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले. यावेळी खासदार इमतियाज जलील तसेच अन्य एमआयएमचे नेते सुद्धा उपस्थित होते. कबरीचे दर्शन घेतल्यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. यावरून राजकारण सुरू झाले असून वादविवाद वाढत आहेत. दरम्यान, एका राजकीय पक्षाने औरंगजेबाची कबर तोडण्याची धमकी दिल्याने खुलताबादेत मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळं वातावरण तापले होते. यावर उपाय म्हणून आजपासून औरंगजेबची कबर पर्यटकांना पाहण्यासाठी बंद राहिल असं पुरातत्व खात्याने म्हटले आहे. या निर्णयामुळं वाद होणार नाहीत असं बोललं जातंय.