
पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, आता शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना, सरकारला घरचा आहेर दिला आहे.
बीड – भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणापासून मागील काही दिवस पंकजा मुंडे लांब आहेत. मात्र त्यानंतर शिवशक्ती यात्रा करत पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या. या शिवशक्ती यात्रेला लोकांचा चांगला पाठिंबा देखील मिळाला. मात्र आता त्यांच्या अडचणीत भर घालणारी एक बातमी समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, आता शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना, सरकारला घरचा आहेर दिला आहे. (after pankaja munde factory action bachu kadu complains to the government so action must have been taken)
…म्हणून त्यांच्यावर कारवाई
दरम्यान, आज पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावरील कारवाई झाले. असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारला असता, ते म्हणाले की, “पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या. त्यांच्या यात्रेला मोठा पाठिंबा व लोकांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं”, असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
कोणत्या कारणांमुळं कारवाई?
मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यातदेखील छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने केंद्र सरकारचा 19 कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारीच यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. याबाबत वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशीही सुरु होती. मात्र या धाडीमुळं पंकजांच्या अडचणीत वाढ झाली आहे.