बैठकीत पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, मिठाई वाटून व्यक्त केला आनंद; तर फटाके…

पवारांनी सुचवलेल्या समितीनं घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. समितीचे प्रवर्तक प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिलीय. यानंतर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर सकाळापासून ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

    मुंबई – शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या समितीची बैठक (meeting) संपली असून, या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत, या बेठकीत काही ठराव मांडल्याचे त्यांनी सांगितले. पहिला ठराव म्हणजे पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच राहवे, असा ठराव मांडण्यात आल्याचे पटेलांनी सांगितले. तसेच शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्याचे बैठकीत झाल्याचे प्रफुल पटेलांनी सांगितले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळल्यात आलेला आहे. पवारांनी सुचवलेल्या समितीनं घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. समितीचे प्रवर्तक प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिलीय. यानंतर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर सकाळापासून ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

    कार्यकर्त्यांचा जल्लोष…

    दरम्यान, बैठक संपल्यानंतर प्रफ्फुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेली चर्चा तसेच ठराव मांडण्यात आल्याचे देखील पटेलांनी सांगितले. पवारांनीच अध्यक्षपदी राहावे या निर्णय झाला असं पटेलांनी सांगितल्यावर सकाळपासून राज्यभरातून आलेले कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऐकमेकांचे अभिनंदन करत, मिठाई भरवत तसेच फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. देशाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. हा राजीनामा नामंजूर करण्यात येत असून, त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून कायम राहावे, अशी विनंती करण्यात येते आहे. मामूहिक भावना हीच आहे की, त्यांनीच पदावर कायम राहावे. त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेच्या भावनांचा आदर करुन त्यांची त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे.

    बैठकीत काय झाले?

    पवार यांच्या घोषणेनंतर देशातील अनेक पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून त्यांची भावना व्यक्त केली होती. राष्ट्रवादीसह इतर मान्यवरांनीही शरद पवार यांनी अध्यत्रपद सोडू नये, अशी मतं व्यक्त केली होती. राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांची तीव्र भावनाही पाहायला मिळालीय. संपूर्म महाराष्ट्र आणि देशात जिथे जिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, त्याच्या मनात वेदना आणि नाराजी आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळं आम्ही स्तब्ध झालो होतो. आम्हालाही या निर्णयाची कल्पना न्वहती. त्यावेळी सभागृहात काय भावना होती, हे सगळ्यांनी पाहिले. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतरही अनेक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी पवारांची भेट घेतली. आम्ही त्यांना विनंती करत होतो की देशाला, राज्याला आणि पक्षाला त्यांची गरज आहे. पवार यांचा अनुभव आणि व्याप प्रत्येक राज्यात आणि देशात सरलेला आहे, असं पटेल म्हणाले.