दुचारीचे स्पेअर पार्ट काढुन दुचाकी फेकायचा विहिरित, चोरीसाठी चोरट्यान लढवली अनोखी शक्कल

शेगाव-संग्रामपूर मार्गावरील एका विहिरीतून तब्बल 12 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या आहेत.

    बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातून चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  दुचाकी चोरीच्या प्रकरणात तपास करताना पोलिसांना विहिरीत दुचांकीचा मोठा साठा आढळला आहे. या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत. सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम (वय 38 वर्षे) असं या चोराच नाव आहे.

    खामगाव (Khamgaon) शहरात दुचाकी चोरीच्या सातत्यान तक्रारी येत असल्याने पोलिसांनी शेगावातून एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या दुचाकींचा शोध घेतला असता त्याने त्या दुचाकी विहिरीत टाकल्याचं सांगितलं. हा दुचाकी चोर दुचाकी चोरुन तिचे फक्त चाक आणि बॅटरी काढून ते विकायचा. तर दुचाकी शेगाव-संग्रामपूर मार्गावरील विहिरीत टाकून द्यायचा. दरम्याने त्याने  दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संग्रामपूर मार्गावरील दोन विहिरीतून सुमारे 12 दुचाकी बाहेर काढला असून अजूनही अनेक दुचाकी विहिरीत असून ते काढण्याचं काम पोलीस करत आहेत.

    चोरी केल्यानंतर दुचाकी फेकायचा विहिरीत

    या चोराने अनेक दिवसात अनेक दुचाकी चोरी केल्या. दुचाकी चोरी  केल्यानंतर त्याचे चाक आणि बॅटरी काढून तो दुचाकी विहिरीत टाकायचा.  शेगाव-संग्रामपूर मार्गावरील एका विहिरीतून तब्बल 12 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या आहेत. पोलीस आणखी काही दुचाकींचा शोध घेत असून दुचाकी चोरांची टोळी असल्याचा त्यांना संशय आहे.