कोरोनासोबत  लढा देऊन परतल्यानंतर नवनीत राणा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण

खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यानंतर काही दिवसातच नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने स्पष्ट झाले आहे.

खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यानंतर काही दिवसातच नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याने स्पष्ट झाले आहे.  नवनीत कौर राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नागपूर येथील वोकहार्ट रुग्णालयातून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्या उपचारांना त्यांनी उत्तम प्रतिसाद देखील दिला होता. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन त्या परतलेल्या होत्या.  १६ ऑगस्ट रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर २० दिवसांसाठी क्वारंटाइन राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण मुंबई महापालिकेने डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा चाचणी केली असता नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.