शरद पवारांनी ममता बॅनर्जींना लिहलेल्या पत्रानंतर, पवार सर्व पक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक घेणार? भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचालींना वेग

सर्व पक्षीय एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. भाजपाला आवर घालण्यासाठी आणि त्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी सर्व पक्षियांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता शरद पवार बिगर भाजप पक्षांची मुंबईत एक बैठक घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

    मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेला भाजपाने मागील सात आठ वर्षात महागाई, बेकारी, बेरोजगार आदी समस्या वाढल्यामुळं तसेच केंद्रातील भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्यानं आता सर्व पक्षीय एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. भाजपाला आवर घालण्यासाठी आणि त्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी सर्व पक्षियांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता शरद पवार बिगर भाजप पक्षांची मुंबईत एक बैठक घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

    दरम्यान, एकीकडे शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं या मागणीला त्यांच्यात पक्षातून जोर धरु लागला असताना, शरद पवार मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्यासाठी पत्र लिहून आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी नेत्यांची बैठक शरद पवार मुंबईत आयोजित करू शकतात असं सूत्रांकडून कळतंय. त्यामुळं भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी पवार आक्रमक झाले असून, हालचालींना वेग आला आहे.

    याआधी सुद्दा तेलंगणाचे मुख्यमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. तसेच या भेटीत आपण सर्व पक्षांनी भाजपाच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे अशी चर्चा या भेटीतून झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यावेळी सुद्धा भाजपविरोधी चर्चांना उधाण आले होते, पण आता शरद पवारांच्या यूपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेनंतर पवार सुद्धा अँक्शन मूडमध्ये आले असून, त्यांनी देशातील अन्य नेत्यांना संपर्क केल्याचे सुत्रांची माहिती आहे. तसेच ममत बनर्जी यांना बैठकीबाबत पत्र लिहिले होते.