शिवसेनेनंतर काँग्रेसचे आमदार फुटीच्या मार्गावर

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली १० आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर समर्थक आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणूक (MLC Election) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. आमदार फुटल्याने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद उघड झाली आहे. यावर मंत्री विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येही (congress) नाराजी (Angry) असल्याचे समोर आले आहे.

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली १० आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर समर्थक आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का, यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले कि, महाराष्ट्रात विधानपरिषदेत काँग्रेसच्या आमदारांची कोणती रणनीती ठरली हे मला अजूनही समजली नाही. यासाठी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन आम्ही बैठक घेणार आहोत. चंद्रकांत हंडोरे यांना प्रथम पसंतीची अनेक मते मिळाली होती. तरीही त्यांना दुसऱ्या पसंतीत फारच कमी मते मिळाली, ही चिंतेची बाब आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आज बोलावण्यात आली आहे यावर काय निर्णय होतो यावर आम्ही माध्यमांशी बोलणार आहे असे ते म्हणाले.