राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंन्टीलेटरवर; ठाणे, नांदेडनंतर आता नागपूरमध्ये मृत्यूचे तांडव सुरुच; मेडिकल व मेयो रूग्णालयात 48 तासात 25 रुग्णांचा मृत्यू

नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातील (Nanded Hospital Death Case) मृत्यूची घटना ताजी असताना, आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात मागील 24 तासांत 25 रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    नागपूर : सध्या राज्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंन्टिलेटरवर आहे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आरोग्ययंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. कारण अनेक शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा यामुळं रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातील (Nanded Hospital Death Case) मृत्यूची घटना ताजी असताना, आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात मागील 24 तासांत 25 रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळं संताप व्यक्त होत असून, सरकारवर टीका केली जात आहे. (After Thane, Nanded, now the death spree continues in Nagpur; 25 patients died in 48 hours at Medical and Mayo Hospital)

    24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू…

    दरम्यान, नांदेडमधील सरकारी रूग्णालयातील मृत्यू प्रकरण ताजं असताना आणि आता मृत्यूचा आकडा 34 वर पोहचला असताना, आता नागपुरातही मृत्यू तांडव सुरुच आहे. नागपुरातील मेडिकल रूग्णालयात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मेयो रूग्णालयात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन तीन महिन्यात राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचा संख्येत मोठी वाढ होत आहे. आधी ठाणे, औरंगाबाद, नांदेडनंतर आता नागपूरमध्ये शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 रुग्णाचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक समोर आलं आहे. त्यामुळं या मृत्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल विचारला जात आहे.

    कोणता कारणामुळं मृत्यू?

    अपुरा व औषधांचा तुटवडा तसेच वेळेवर रुग्णांस औषध न मिळणे, कमी असणारे कर्मचारी आदी कारणांमुळं शासकीय रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, “खासगी रूग्णालयातून अत्यावस्थ या ठिकाणी येतात. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे”. दरम्यान, या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नांदेडमध्ये सोळा नवजात बालकांचा समावेश आहे, यात एक-दोन दिवस जन्माला आलेल्या नवजात बालकांचा समावेश असल्याचं नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, सरकारने या मृत्यूंची जबाबदारी घेतली पाहिजे अशी मागणी होत आहे.