सामाजिक सुरक्षा विभागाची ‘तोफ’ धडाडणार की थंडावणार

शहरातील अवैध धंद्यावर सध्या सामाजिक सुरक्षा विभाग (सासु) जोरदार कारवाई करत आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याकडून या कारवाया सुरू आहेत. त्यांच्याकडे सामाजिकचा अतिरीक्त कार्यभार आहे. चार महिन्यात त्यांनी अवैध धंदेवाल्यांची पळताभुई थोडी केली आहे. दुचाकी, रिक्षा अन फिरस्त्या मटक्यांवर देखील त्यांच्याकडून चाणाक्क्षरित्या कारवाई केली जात आहे.

    पुणे –  शहर पोलीस दलात कारवाईचा “धमका” उडवून देणाऱ्या “सासु”च्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच अवैध धंद्यावरील कारवाईदरम्यान अमाणूष मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आपसूकच त्यानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली अन आता संध्याकाळीच विकेट जाणार, अशी अटकळ सर्वांनीच बांदली. परंतु, ते निरीक्षक थेट वरिष्ठांकडे स्वत:हून जात याबाबत माहिती दिल्यानंतर अतिवरिष्ठांनी त्यांना एका वाक्यात “बी केअरफुल” इतकीच प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सासुची थोफ धडकणारच अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या वरिष्ठ निरीक्षकांची पोलीस उपायुक्तांमार्फत अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून, मारहाण चुकीच असल्याचे स्पष्ट करत चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘त्या’ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण पुणे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

    शहरातील अवैध धंद्यावर सध्या सामाजिक सुरक्षा विभाग (सासु) जोरदार कारवाई करत आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याकडून या कारवाया सुरू आहेत. त्यांच्याकडे सामाजिकचा अतिरीक्त कार्यभार आहे. चार महिन्यात त्यांनी अवैध धंदेवाल्यांची पळताभुई थोडी केली आहे. दुचाकी, रिक्षा अन फिरस्त्या मटक्यांवर देखील त्यांच्याकडून चाणाक्क्षरित्या कारवाई केली जात आहे. या कारवाईची खदखद सध्या पोलीस दलात मोठी आहे. याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

    सामाजिककडून होणारी कारवाई अतिरेकी असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. कारवाईदरम्यान, फरार म्हणून नावे टाकली जातात अन पत्रे, ताडपत्री तसेच आतील साहित्य काढून आणत कारवाईचा आकडा वाढविली जातो, असे बोलले जात आहे. यापुर्वी देखील कारवाई होत असत पण, त्याकाळात अशा कारवाई नसत अशी प्रतिक्रिया पोलीस आता देत आहेत. तर, अनेकवेळा पाहण्यास आलेल्यांना देखील कारवाई ओढले जात असल्याची माहिती आहे. नुकत्याच एका कारवाईत एक बिल्डर त्यांच्या कार चालकाला शोधत आले होते. नेमका तो चालक मटका कारवाईत अ़डकला. बिल्डर शोधत-शोधत त्याठिकाणी आले अन त्यांनाही कारवाईत घेण्याचा प्रयत्न झाला. पण, नंतर खऱ्या गोष्टी सांगत अन बराच गोंधळ झाल्यानंतर सोडले गेले. अनेकवेळा कारवाईवेळी अशा गोष्टी घडत असल्याची चर्चा आहे. पण, दुसरीकडे त्याला अर्थ नाही, बदनामीसाठी ही अफवा उठवली जात असल्याचे बोलतात. पण, कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नसावा, अशी प्रतिक्रिया देखील यामुळे उमटू लागली आहे. यावरून खरे कोणाचा असाही प्रश्न खुद्द पोलिसांनाच आहे.

    सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा दोन मिनीटांचा एका व्यक्तीला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ते अमानूष मारहाण व शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. शिस्तप्रिय पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानूसार कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, त्यांची उचलबांगडी न करता त्यांना बी-केअरफुल असे अतिवरिष्ठांनी सांगितले आहे. मारहाण चुकीचीच असून, त्यावर निश्चित कारवाई होईल, असे एका वरिष्ठांनी सांगितले. पण, सध्या या व्हायरल व्हिडीओ अन सामाजिकच्या कारवाईने आख्या पोलीस दलाला वेड लावले आहे, हेही तितकेच खरे. दरम्यान, हा व्हिडीओ खूपच जुना असल्याची माहिती असून, तो आत्ताच कसा व्हायरल झाला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सध्या पेट्रोलचे एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. पेट्रोल संबंधित व्यक्तींनी थेट मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेत लक्ष घालण्याची विनंती केली होती. याप्रकरणात मोठे झोल बाहेर निघण्याची शक्यता आहे. ती कारवाई देखील पुराणिक यांनीच केली असून, त्यात खोलवर कारवाई होण्याची शक्यता आहे.