उपोषणानंतर आता मनोज जरांगे करणार महाराष्ट्र दौरा; जाणून घ्या कसा असेल दौरा?

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात त्यांनी उपोषणही केले होते. पण आता मनोज जरांगे हे येत्या 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

  जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात त्यांनी उपोषणही केले होते. पण आता मनोज जरांगे हे येत्या 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. ‘मराठा आंदोलनाला डाग लागता कामा नये. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. त्याशिवाय थांबणार नाही. येत्या 15 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून, 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे. मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे. तर एक डिसेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

  कोणी पैसे मागितले तर देऊ नका

  राजकारणी नेते, अधिकारी, डॉक्टर या सगळ्यांना माहिती आहे की दौऱ्यात पैसे घेतले जात नाही. कोणी मागितले तर देऊ नका. जर दिले असेल तर त्यांच्याकडून परत घ्या. जर कुणी चारआणे दिले असेल तर परत घ्या ही सगळ्यांना सूचना आहे. जर आम्हाला माहीत झालं पैसे घेत आहे. तर समाज त्याची गय करणार नाही, माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

  असा असेल महाराष्ट्र दौरा…

  15 नोव्हेंबर – वाशी, परांडा करमाळा

  16 नोव्हेंबर – दौंड, मायनी

  17 नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड

  18 नोव्हेंबर – सातारा, वाई, रायगड

  19 नोव्हेंबर – रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी

  20 नोव्हेंबर – तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा

  21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर

  22 नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर

  23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधगाव.