मला नाही निरोप, मी कशाला येऊ?” अधिष्ठाता पोहचले ओमप्रकाश शेटेंची बैठक संपल्यावर, नणंदकरांना घेतले फैलावर 

आयुष्यमान भारत योजना लवकरच सुरू होत आहे, त्यासाठी रुग्णलयांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामकाज याबाबत आढावा बैठक होती, मात्र शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर बैठक संपल्यावर उशिरा धावतपळत आले, त्यांनी मला निरोप नसल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्ष त्यांना रीतसर निरोप देण्यात आलेला होता. 

    सांगली :आयुष्यमान भारत योजना लवकरच सुरू होत आहे, त्यासाठी रुग्णलयांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामकाज याबाबत आढावा बैठक होती, मात्र शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर बैठक संपल्यावर उशिरा धावतपळत आले, त्यांनी मला निरोप नसल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्ष त्यांना रीतसर निरोप देण्यात आलेला होता.
    आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती, बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, आरोग्य अधिकारी  यांच्यासह जिल्ह्यातील सहभागी रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते, मात्र याच बैठकीला शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर नव्हते, एका योजनेत शासकीय रुग्णालयाने चांगले काम केल्या बद्दल त्यांचा सत्कार करायचा होता, मात्र नाव पुकारल्यावर समजले की ते आलेलेच नाही, अखेर कोणी तरी निरोप दिल्यावर अधिष्ठाता धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात आले, त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी ” मला नाही निरोप, मी कशाला येऊ ?” अशी भूमिका घेतली, त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी गांभीर्याने दखल घेऊन निवासी जिल्हाधिकारी यांना विचारणा केली, त्यानंतर डॉ.नणंदकर यांना मेडिकल ऑफिसर कडून निरोप पाठवला असल्याचे स्पष्ट झाले, त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांना चांगलेच फैलावर घेतले.
    सामान्य लोकांच्या अत्यंत महत्वाच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख उपस्थित असताना अधिष्ठाता उपस्थित नाहीत, वैद्यकीय शिक्षण विभागाला का गांभीर्य नाही, असे शेटे यांनी नणंदकर यांना सुनावले व मिळालेलं प्रमाणपत्र त्यांना केवळ औपचारिकता म्हणून बक्षिस प्रमाणपत्र दिले.