मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ट्रिपल इंजिन सरकार होईल, टीका कराल त्याच्या १० पट काम करु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोदींपुढे निर्धार

येत्या काळात मुंबईचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा दिवस सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. २०१५ साली मेट्रोचं भूमीपूजन ज्यांनी केलं त्याच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणं, हा दैवी योग आहे. महाराष्ट्राची जनता सुदैवी आहे. अनेक जणांची इच्छा होती की हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. मात्र नियतीच्या समोर काहीही चालत नाही. मुंबईत होणाऱ्या कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते व्हाही अशी आमची इच्छआ होती.

  मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत आले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची मोठी जय्यत तयारी तसेच सुरक्षा करण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्यावर विरोधकांकडून टिका होत आहे. तसेच ही सर्व कामे आमच्याच सरकारच्या काळात झाली आहेत, असं विरोधकांनी म्हटलं आहे. विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांचं स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मोदींना पाहण्यासाठी आणि एकण्यासाठी मोठी गर्दी झालीय. मविआ सरकारच्या काळात किती विकास झाला हे माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्यासाठी, लसोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली. ती केवळ मोदींसारख्या धाडसी नेत्यामुळे हे शक्य झाले, मी जेव्हाही मोदींना पाहतो, त्यांना भेटतो. त्यावेएळी मनात एक पवित्र भाव निर्माण होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असं काही आहे की त्यामुळं विश्वास वाटतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) म्हणाले.

  आजचा दिवस सुवर्णक्षरांनी लिहून ठेवावा…

  येत्या काळात मुंबईचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा दिवस सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. २०१५ साली मेट्रोचं भूमीपूजन ज्यांनी केलं त्याच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणं, हा दैवी योग आहे. महाराष्ट्राची जनता सुदैवी आहे. अनेक जणांची इच्छा होती की हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. मात्र नियतीच्या समोर काहीही चालत नाही. मुंबईत होणाऱ्या कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते व्हाही अशी आमची इच्छआ होती. ती पूर्ण झाली. गेल्या वर्षाच्या अखेरीस समृद्धी महामार्गाची सुरुवात मोदींच्या हस्ते झाली. आता नव्या वर्षांत आजचा हा शुभारंभाचा आणि मेट्रो लोकार्पणाचा कार्यक्रम मुंबईत होतोय.

  बाळासाहेबांचे व मोदी यांचं जिव्ह्याळ्याचं नातं

  मेट्रोच्या रुपानं आमच्या दोघांचं स्वप्न आज साकार होतोय. बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचं जिव्ह्याळ्याचं नातं होतं. हिंदुत्वाचा अभिमान हा समान धागा होता. विकासाचं राजकारण हा पाया होता. म्हणून विकासकामांचं भूमीपूजनासाठी मोदी आलेत. त्यांचे धन्यवाद. मेट्रोबरोबरच शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक रोडचं लोकार्पण येत्या काही महिन्यात होईल. देशातला आदर्श ठरेल असा वाहतुकीचा आराखडा तयार होईल. मेट्रोचा फायदा मुंबईकरांना होईल. मधले अडीच वर्ष त्यात काम होऊ शकलं नाही. आता या सरकारमध्ये चालना मिळाली. ३५० किमीचं मेट्रोचं जाळं होईल आणि ४० ते ५० लाख वाहनं चालणार नाहीत. हे काम आपलं सरकार करतंय, वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल.

  दुकानदारी बंद होणार

  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २० दवाखाने सुरु करतोय. इच्छाशक्ती दाखवल्यामुळे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडवतोय. काँक्रिट रस्त्यांनर टीका करतायेत, पुढच्या महिन्यात आणखी ५०० किमी रस्ते काँक्रिटचे करतोय. सगळी मुंबई खड्डेमुक्त होईल. यात खोडा घालण्याचं काम होतंय. त्यांना त्यांचं काम करु द्या. आपण आपलं करु. लोकांचा खड्ड्यातला प्रवास मुक्त होईल. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पाढंरं करणाऱ्यांची दुकानदारी बंद होणार आहे. त्यामुळं विरोध होतोय. गेल्या सहा महिन्यात सरकारनं मोठे निर्णय घेतले आहेत. काम करत असल्यामुळे पोटदुखी सुरु झालीय. मळमळ सुरु झालीय. छातीत धडकी भरलीय. सहा महिन्यात इतकं केलं तर दोन वर्षांत आणखी किती करतील, याचा त्रास होतोय.

  टीका कराल त्याच्या १० पट काम करु

  दावोसमध्ये आपल्या देशाबद्दल, पंतप्रधानांबद्दल जगात उत्सुकता आहे. लक्झम्बर्गचे पंतप्रधान भेटले ते म्हणाले मी मोदी भक्त आहे. त्यांनी फोटो काढून घेतला. आणि ते म्हणाले हे मोदींना दाखवा. दावोसमध्येही मोदींच्या नावाचा डंका, हा आमचा गौरव आहे. तकाहींनी विचारलं त्यांना सांगीतलं की आम्ही मोदींचीच माणसं आहोत. १ लाख ५५ हजार कोटींचे प्रकल्प मिळाले यामागे मोदींचाच आशीर्वाद आहे. मोदींचं नाव जगातील सगळ्या मोठ्या देशांच्या नेत्यांच्या तोंडावर आहे. जी २० चं अध्यक्षपद मिळालं हाही गौरव आहे. गेल्या सात-आठ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था सुधारल्यामुळं जी-२० चं अध्यक्षपद मिळालंय. टीका कराल त्याच्या १० पट काम करु, टीकेला उत्तरे कामानं देईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

  काही जणांच्या पोटात दुखतंय

  आयुक्त इक्बाल सिंह यांनी चांगलं काम केलं. मुंबईला चमकवलं. त्यातही काही जणांच्या पोटात दुखतंय. इतकं वर्ष तुम्ही केलं नाही ते आम्ही केलं, तर त्याला चांगलं तर म्हणा. मुंबईचा विकास करायचाय, मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचाय. मुंबईत जे गेले काही वर्षात झालं नाही ते आम्ही सुरु केलंय. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न आहे.

  महाराष्ट्राला नवी ओळख मिळवून देवू

  पुढील तीन वर्षांत मुंबईचा कायापालट करण्याचा मानस आहे. केंद्राचं पाठबळ, मोदींच्या रुपानं आहे. महापालिका निवडणुकीत डबल इंजिनचं ट्रिपल इंजिनमध्ये रुपांतर होईल. मुंबईचा विकास आणखी गतीनं होईल. मुंबई आणि महाराष्ट्राला नवी ओळख मिळवून देवू. मोदींच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवणार