raj thackeray

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोशल मीडियावरुन धमकी आली होती. तसेच दुसरी एक धमकीचे पत्र आले होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना सुद्धा धमकी आली होती. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढविण्यात आला आहे.

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोशल मीडियावरुन धमकी आली होती. तसेच दुसरी एक धमकीचे पत्र आले होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना सुद्धा धमकी आली होती. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढविण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जोपर्यंत मशिदीवरील भोंगे हटविण्यात येत नाहीत, तोपर्यंत हनुमान चालीसाचे पठन झाले पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर याचे पडसाद देशभर पाहायला मिळाले.  

    दरम्यान, मुस्लीम तसेच भोंगेविरोधी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्यामुळं त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे कळते. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. दरम्यान यावर राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. आणि आज अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या ताफ्यात अतिरिक्त पोलीस सुरक्षा असणार आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच Y+ असणार आहे. पण आता पोलिसांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सुरक्षा ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने सुरक्षा दिली असली तरी, केंद्राकडून राज ठाकरेंना सुरक्षा मिळणार अशी शक्यता बोलली जात आहे. राज्याने सुद्धा याआधी जर ठाकरेंना सुरक्षा हवी असेल तर ती आम्ही देऊ असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे आता राज्य शासनाने राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केली आहे.