After Uddhav Thackeray's suspicions, shocking revelation in the postmortem report, Abhishek Ghosalkar's death by not three but four bullets

  मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर  (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या हत्येबाबत शंका व्यक्त करीत, अभिषेक घोसाळकर आणि त्यांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) यांची सुपारी देऊन हत्या झाली का, असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर आता अभिषेक घोसाळकर यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Abhishek Ghosalkar postmortem report ) अर्थात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
  तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्याचं सांगितलं
  अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने(Morris Noronha) समोरुन पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शवविच्छेदन अहवालात घोसाळकरांना चार गोळ्या लागल्याचं म्हटले आहे.
  अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू नेमका कसा झाला? (Abhishek Ghosalkar postmortem report)
  दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार, अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे झाल्याचे नमूद आहे. जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तशी नोंद आहे. घोसाळकर यांना या घटनेत चार गोळ्या लागल्याचं समोर आले आहे. मॉरिस नोरोन्हाने (Morris Noronha) समोरुन गोळ्या झाडल्या.
  या गोळीबारात अभिषेक घोसाळकर गंभीर जखमी
  फेसबुक लाईव्हदरम्यान हा सगळा थरार रंगला होता. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर गंभीर जखमी झाले होते. घोसाळकरांना उपचारासाठी बोरिवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्राव झाला त्यामुळे अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.
  उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त (Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar death)
  दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, या सर्व हत्याकांडाबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. मॉरिसने फेसबुक लाईव्ह सुरु असताना, अभिषेक घोसाळकरवरगोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं.  मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेले नाही. मॉरिस नोरोन्हाला अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर सूड उगवायचा होता मग त्याने स्वत:ही आत्महत्या का केली? हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.
  समोरुन पाच गोळ्या झाडल्याची माहिती (Abhishek Ghosalkar)
  मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या झाली.  अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा गुरुवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. या लाईव्हदरम्यानच मॉरिसने तब्बल 5 गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकरांना लागल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र आता पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये घोसाळकरांना 4 गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.
  अभिषेक घोसाळकर यांची हत्या 
  मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. फेसबुक लाईव्हदरम्यान हा सगळा थरार रंगला.मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. बलात्कार प्रकरणात गोवल्याचा राग मॉरिसला होता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.
  अमरेंद्र मिश्राला कोठडी 
  अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि  मॉरिसचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्राचा (Amrendra Mishra) समावेश आहे. अमरेंद्र मिश्राला आज कोर्टात हजर केलं असता, त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.