विधान परिषदेचा अर्ज मागे घेतल्यानंतर सदाभाऊ खोत थेट पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे (Heavy rain) केळी, डाळींब, आंबा, मका व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तेथील शेतकरी (farmers) प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. मंगळवारी रात्री उशिरा आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhu Khot) यांनी चांदज गावातील युवराज तांबवे (Yuvraj tambave) यांच्या केळीच्या शेताला भेट देऊन पाहणी केली.

    सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी (Madha Tebhuarni) परिसरातील कोंढार भागातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे (Heavy rain) केळी, डाळींब, आंबा, मका व इतर फळबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तेथील शेतकरी (farmers) प्रचंड मोठ्या संकटात सापडला आहे. मंगळवारी रात्री उशिरा आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhu Khot) यांनी चांदज गावातील युवराज तांबवे (Yuvraj tambave) यांच्या केळीच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. तीव्र वादळामुळे केळीच्या पिकाचं मोठे नुकसान झालेले आहे. पण याची साधी दखल घ्यायला कृषी विभागाचे अधिकारी (Farmer officers) तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार कोणीही फिरकले सुद्धा नाहीत.

    सोलापूर जिल्ह्यातील माढा (Solapur distric madha) तालुक्यात बुधवारी आलेल्या वादळी वारे व पावसामुळे कोंढारभागातील हजारो हेक्टर केळीची शेती (Banana farm) भुईसपाट झाली आहे. त्याचबरोबर माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील कोंढारभागातील रांझणी, नगोली, गारअकुले, आढेगाव, आलेगाव, बुद्रुक, आलेगाव खुर्द, वडोली या गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाची मदत करावी, चालू पिक कर्ज माफ करावे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारकडे (government) केली.