कोल्हापुरात गोकुळ व जिल्हा बँकेवरुन राजकारण तापले, महाडिक व मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात अशा घडामोडींना वेग आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील पारंपारिक असलेले विरोधक सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. (Hasan Mushrif vs Dhanajay Mahadik) यामुळे जिल्हा बँक (KDC bank) आणि गोकुळच्या (Gokul) राजकारण चांगलीच तापले आहे.

    कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं की, तांबडा पांढरा रस्सा आठवतो. याचबरोबर इथे राजकारणातील दर्दी माणसं कोल्हापूरचं राजकारणचे वेगळं अशी इथली माणसं गंमतीनं म्हणतात. कोल्हापुरातील पालिका (Kolhapur corporation) बैठकीत हाणामारी ऐकमेकांना खुर्च्या फेकून मारल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. कोल्हापुरात राजकारण हा विषय प्रत्येकाच्या आवडीचा विषय. जिल्ह्यात महाडिक, मुश्रीफ आणि पाटील (mahadik, mushrif and patil) यांचे कित्येक दिवसांपासून साम्राज्य आहे, तर मविआपासून सतेज पाटील व हसन मुश्रीफ एकत्र आल्यामुळं महाडिक कुटुंब सत्तेच्या बाहेर जाणार का अशी चर्चा होती. त्यातच सतजे पाटील आणि महाडिक कुटुंबीय यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर. सत्ताकारणावरुन या दोघात कलगीतुरा रंगल्याचे सर्वांनी पाहिले आहे. आता पुन्हा एकदा हे दोघे ऐकमेकांसमोर आले आहेत. (Satej patil vs vs Dhanajay Mahadik)

    दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात अशा घडामोडींना वेग आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील पारंपारिक असलेले विरोधक सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. (Hasan Mushrif vs Dhanajay Mahadik) यामुळे जिल्हा बँक (KDC bank) आणि गोकुळच्या (Gokul) राजकारण चांगलीच तापले आहे. गोकुळमध्ये सत्ता बदलाचा दावा करणारे खा. महाडिक यांना माजी मंत्री हसन मुश्रीम यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. दोन्हीही संस्थांच्या आर्थिक प्रगतीचा कारभार समजावून सांगू, त्यानंतर ते गोकुळच्या सत्तांतराबाबत यापुढे कधीच उल्लेख करणार नाहीत, असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिकांना टोला लगावला आहे. त्यामुळ मुश्रीफांच्या या वक्तव्याला महाडिक कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल.