
महानगरपालिकेद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध नागरी सुविधा व उपक्रम यांचे अनुकरण बन्याचदा देशातील इतर महानगरपालिका करतात. त्याचे बरे-वाईट परिणाम मुंबई क्षेत्रातील नागरिकांसह इतर महानगरातील नागरिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या होतात. यास्तव, महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम तसेच आपत्कालीन घटना यांची माहिती सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन प्रसारमाध्यमांना देणे आवश्यक आहे.
मुंबई: पारदर्शक कारवाईचा (Transparent Action) असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेने (BMC) आता अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मज्जाव केला आहे यापूर्वी देखील मंगळवारी महापालिका आयुक्त इकबलसिंग चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी असाच फतवा काढला होता प्रसार माध्यमांनी केलेल्या चर्चेमुळे त्यांनी हे परिपत्रक मागे घेत घेतले.
मात्र पुन्हा नव्याने गुरुवारी अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मज्जाव करणारे परिपत्रक जारी केल्याने आता आयुक्तांच्या धर सोड वृत्तीचा पुन्हा प्रत्यय आला आहे. नव्या परिपत्रकानुसार आता केवळ सहायक आयुक्त, उप आयुक्त संचालक / सह आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना माहिती देता येणार असून त्याव्यतिरिक्त इतर कुणालाही प्रसारमध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
नेमके काय आहे परिपत्रक
महानगरपालिकेद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध नागरी सुविधा व उपक्रम यांचे अनुकरण बन्याचदा देशातील इतर महानगरपालिका करतात. त्याचे बरे-वाईट परिणाम मुंबई क्षेत्रातील नागरिकांसह इतर महानगरातील नागरिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या होतात. यास्तव, महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम तसेच आपत्कालीन घटना यांची माहिती सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन प्रसारमाध्यमांना देणे आवश्यक आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशाशिवाय बऱ्याचदा विभाग / खाते प्रमुख हे प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती पुरवितात. त्यामुळे बऱ्याचदा उलट-सुलट माहिती प्रसारित होऊन महानगरपालिकेच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेस धक्का पोहचतो असे पत्रकार म्हटले आहे.
यास्तव, यापुढे महानगरपालिकेबाबतच्या कामकाजाशी निगडित माहिती प्रसारमाध्यमांना देताना सर्व संबंधित सहायक आयुक्त, उप आयुक्त संचालक / सह आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त है महानगरपालिका पायाभूत सुविधा, प्रकल्प, उपक्रम, योजना आणि नागरी सेवा-सुविधा या बाबतची माहिती वृत्तपत्रीय प्रतिनिधींना देऊ शकतील. इतर खाते प्रमुख / विभाग प्रमुख यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची परवानगी घेऊनच प्रसारमाध्यमांना माहिती देऊ शकतात. तसेच वृत्तवाहिन्यांना माहिती देण्यासाठी त्या-त्या संबंधित खात्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त व महानगरपालिका आयुक्त हेच सक्षम प्राधिकारी असतील असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.