मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आमरण उपोषण

सर्वोच्च न्यायालयाचे (superme court) उल्लंघन करून रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजेपर्यंत सभा घेतल्यामुळं कायद्याची उल्लंघन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आयोजकांवर गुन्हा दाखल (FIR) करण्याबाबत रीतसर एक ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती, तसेच उपोषणकर्त्यांनी (protest) एक ऑगस्ट रोजी क्रांती चौक येथे तक्रार दाखल केल्या होत्या, परंतु अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा कारवाई  करण्यात आला नाही.

    औरंगाबाद : औरंगाबाद शहरात 31 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वेळेचे बंधन न पाळता सभा घेतल्यामुळं आंबेडकरवादी संघर्ष समितीने (Ambedkarwadi samiti) आमरण उपोषण केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (superme court) उल्लंघन करून रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजेपर्यंत सभा घेतल्यामुळं कायद्याची उल्लंघन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आयोजकांवर गुन्हा दाखल (FIR) करण्याबाबत रीतसर एक ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती, तसेच उपोषणकर्त्यांनी (protest) एक ऑगस्ट रोजी क्रांती चौक येथे तक्रार दाखल केल्या होत्या, परंतु अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा कारवाई  करण्यात आला नाही.

    दरम्यान, तक्रार देऊन सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही, त्या अनुषंगाने आज सामाजिक कार्यकर्ते आनंद कस्तुरे व मनोज वाहुळ यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. पोलीस प्रशासनातर्फे लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन व लेखी स्वरुपात आदेश देण्यात आले, त्यामुळे उपोषण स्थगित करत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले असून, लवकर कारवाई नाही झाली तर, आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला.