संभाजी भिडेंना अटक करण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक, राज्यभर कॉंग्रेसकडून आंदोलन

अमरावतीत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आंदोलन करत आहे. तसेच यावेळी भिडे हा बोलावती धनी आहे. हा भाजपाचाच कट असल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केला आहे. सरकारने त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. असं ठाकूर म्हणाल्या.

    अमरावती: श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावर भाजपा सोडून सर्वंच पक्षांनी भिडेंचा निषेध करत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, भिंडेवर टिका केली म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तर भिडेंविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात आहे. दरम्यान, भिडेवर अटकेची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. तसेच गृहमंत्र्यांनी देखील कारवाईचे संकेत दिले आहेत. भिडेंना अटक करा, या मागणीसाठी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

    भिडेंना तात्काळ  अकट करा – काँग्रेस 

    दरम्यान, भिडेंना अटक करा, या मागणीसाठी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्वच्या चौकात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरुये. या आंदोलनात आमदार विश्वजीत कदमही दाखल झालेत. तसंच संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आलीये. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये. तर दुसरीकडे अमरावतीत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आंदोलन करत आहे. तसेच यावेळी भिडे हा बोलावती धनी आहे. हा भाजपाचाच कट असल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केला आहे. सरकारने त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. असं ठाकूर म्हणाल्या.

    काय म्हणाले भिडे?

    भिडे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळं त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे अमरावतीच्या बडनेरामध्ये एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले.