शेतकरी आक्रमक! लाल वादळ पुन्हा मुंबईच्या दिशेनं, शेतकऱ्यांची आज होणारी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक उद्यावर; शेतकरी मोर्च्यावर ठाम…

शेतकरी नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या लॉंग मोर्च्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार होती, मात्र ही बैठक आज रद्द करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे.

नाशिक– युती सरकारच्या काळात म्हणजे २०१७ साली शेतकऱ्यांनी (Farmers) आपल्या विविध मागण्यासाठी अभूतपूर्व मोर्चा काढला होता. या मोर्च्यात राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या घटनेला आता पाच ते सहा वर्ष होत असताना, आता पुन्हा एकदा बळीराजा आक्रमक झाला असून, लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे. कांद्याचा (Onions) भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे (Rain) नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आता पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले असून, नाशिकमधून शेतकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. (Farmers Long March)

आजची बैठक रद्द…

दरम्यान, शेतकरी नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या लॉंग मोर्च्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार होती, मात्र ही बैठक आज रद्द करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे. तसेच आज होणारी बैठक पुन्हा कधी होणार याबाबत काही माहिती कळवली नसल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आजची बैठक उद्या होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेनं…

दरम्यान, दोन वर्षापूर्वी दिल्लीत शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असा मोर्चा काढला होता, यावेळी देशातील शेतकरी एकवटला होता. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा शेतकरी मोर्चा काढत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढला आहे. काल दिंडोरीमधून हा लॉन्ग मार्च निघाला. तर आज नाशिकमधून आता हा मोर्चा मुबईच्या दिशेनं येत आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. त्यामुळं २०१७ पुनरावृत्ती पुन्हा एकदा दिसणार आहे. या मोर्च्यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

नाशिकच्या दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली आहे. नाशिक-मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. या लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून वन जमिनीचा प्रश्न आहे, शेतकरी कसत असलेली वन जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी, सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, सोयाबीन कांद्यासह सर्व शेतीमालांना भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, आदी मागण्यांसाठी हा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. त्यामुळं सुरक्षेबाबत पोलिसांनी मोठा फौजफाट तैनात केला आहे.