नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आघाडीचे वर्चस्व:आघाडीचे अठरा उमेदवार विजयी

माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या पॅनेलचा सुपडा साफ 

    सासवड : बारामती तालुक्यातील 22 गावे आणि पुरंदर तालुक्यासाठी कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवल आहे.आघाडीने सर्वच्या सर्व जागांवर म्हणजे 18 जागांवर विजय संपादक करत बाजार समितीवर आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या पॅनेलचा सुपडा साप झाल्याने माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांना मात्र मतदारांनी धक्का दिला आहे. बाजार समितीच्या रूपाने उभा केलेला पॅनल मध्ये एकाही उमेदवाराची एन्ट्री झाली नाही.

    सासवड (ता पुरंदर) येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भावनांमध्ये मतमोजणी संपन्न झाली. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या वतीने सोमेश्वर सहकार पॅनलच्या वतीने 18 उमेदवार उभे केले होते. यामधील व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.तर शिवसेना शिंदे गट भाजप यांच्या वतीने तेरा उमेदवार उभे करण्यात आले होते. या झालेल्या मतमोजणी मध्ये सोसायटी मतदारसंघांमध्ये आघाडीने एकतर्फी विजय संपादित केला,तर ग्रामपंचायत मतदार संघामध्ये युतीने आघाडीला सुरुवातीला जोरदार टक्कर दिली होती मात्र बारामती तालुक्यातील मतदान मिळवण्यात युतीला यश आले नाही. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी बारामतीचे मतदान हे निर्णय ठरले.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीकांत श्रीखंडे तर तहसीलदार रूपाली सरनोबत, बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप, उपस्थित आहेत.

    उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे
    कृषि पतसंस्था महिला प्रतिनिधी महिला प्रतिनिधी मतदार संघ चिन्हे (कपबशी) महा विकास आघाडी (पतंग) महायुती

    कृषि पतसंस्था सर्वसाधारण मतदार संघ सर्वसाधारण

    कामठे देविदास संभाजी (कपबशी) विजयी 1355

    कामठे वामण आश्रु (कपबशी)विजयी१३४३

    गडदरे बाबुराव दशरथ (पतंग) पराभुत३३१

    जगताप आनंद संजय (पतंग)पराभुत३२१

    जगताप प्रविण बाळासाहेब (पतंग)पराभुत३४०

    जगदाळे बाळासो गुलाब (कपबशी)विजयी१३४१

    जगताप शरद नारायणराव (कपबशी)विजयी१३२८

    जेथे सुरेद्र भालचंद्र (पतंग)पराभुत२९०

    धिवार पंकज शशिकांत (पतंग)पराभुत३०९

    निगडे अशोक आबासो(कपबशी)विजयी१३२४

    निगडे सतिश गोविंदराव (विमान)पराभुत१८

    निलाखे पंकज रामचंद्र (कपबशी) विजयी१२९३

    फडतरे संदिप सुधाकर (कपबशी) विजयी१२८७६

    बालगुडे बाळासो मारुती (पतंग)पराभुत ३३०

    भापकर शारदा बाळकृष्ण (पतंग)पराभुत३०८

    कृषि पतसंस्था महिला प्रतिनिधी महिला प्रतिनिधी

    कामथे सोनाली लहू (पतंग)पराभुत ३६६

    थोपटे सारीका गणेश(पतंग)पराभुत३७८

    वाबळे शरयू देवेंद्र (कपबशी) विजयी १४०२

    शेख शहाजान रफीक (कपबशी) विजयी १३६५

    कृषि पतसंस्था इतर मागास प्रवर्ग

    गिरमे दिलीप विठठल (छत्री)पराभुत २०६

    टिळेकर महादेव लक्ष्मण (कपबशी) विजयी१५०९

    भटक्या विमुक्त जाती/जमाती

    खोमणे बाळासो आण्णासो (पतंग)पराभुत ३५६

    गुलदगड भाऊसाहेब विठठ्ल (कपबशी) विजयी १४२४

    ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ

    कटके दिलीप सदाशिव (पतंग) पराभुत ४४७

    मोरे भारत शांताराम (पतंग)पराभुत ४१८

    शिंदे बाळु सोमा (कपबशी) विजयी ५५५

    होले गणेश दत्तात्रय (कपबशी) विजयी ५७३

    ग्रामपंचायत अनुसुचीत जाती जमाती

    कांबळे सुशांत राजेंद्र (कपबशी) ५५८

    गद्रे राजेंद्र भुलाजी (पतंग) पराभुत ४४१

    ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक

    ताकवले सुशिल बाळकृष्ण (पतंग) पराभुत ४७१

    नाझीरकर मनिषा देवीदास (कपबशी) विजयीः ५३५