मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन; १५ डिसेंबरला प्रांत कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे

मुस्लिम समाजातील विविध मागण्यासंदर्भात (दि. १५) डिसेंबरला प्रांत कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आतार तांबोळी विकास संस्था संचलित मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी नियाजभाई आतार यांनी दिली.

    फलटण : मुस्लिम समाजातील विविध मागण्यासंदर्भात (दि. १५) डिसेंबरला प्रांत कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आतार तांबोळी विकास संस्था संचलित मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी नियाजभाई आतार यांनी दिली.

    १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक दिवस साजरा करावा, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर आयोगाच्या निष्कर्षच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनामध्ये मुस्लिम समाजासाठी १५ टक्के राखीव निधी विकासासाठी ठेवावा व याबाबत तरतूद करावी, मुस्लिम समाजाची जातीच्या प्रमाणपत्रासाठी व जात पडताळणीसाठी होणारी अडवणूक दूर करून सुलभ प्रक्रिया करावी, मुस्लिम समाजातील मेहतर, गारुडी, झारी, नाळबंद, महात, पिंजारी, धावड कलावत या जातीचा भटक्या जमातीमध्ये समावेश करावा आदी मागण्यासाठी दि. १५ रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

    याबाबतचे निवेदन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना एका शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. यावेळी हाजी निजाजभाई आतार, सलीमभाई मनेर, अमीरभाई शेख, वसीमभाई मनेर, जमीरभाई आतार, सोहेलभाई मनेर, रफिक पटवेकर, मुबिन इनामदार, जुबेर मनेर आदी उपस्थित होते.