राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेलच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.

    सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेलच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, महिला प्रदेश सचिव नलिनी चंदेले, माजी सभापती राजन जाधव, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष नारायण माशाळकर, मंगला कोल्हे, बिजू प्रधाने, प्रदेश महिला आघाडीच्या सायरा शेख, मनीषा माने, शशिकला कसपटे,लता ढेरे, विजय पुकाळे, सरफराज शेख, रुपेशकुमार भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी मोदी सरकारच्या ओबीसी आरक्षण धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष भारत जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर टीका करताना मध्यप्रदेश मध्ये भाजपची सत्ता असल्याने ओबीसी आरक्षण दिलं जातं मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण दिले जात नसल्याचा आरोप केला.