अग्निपथ योजनेमुळे महाराष्ट्रात वातावरण तापलं; राज्यभर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर

अग्निपथ योजनेअंतर्गंत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्यात आले.

    मुंबई : अग्निपथ योजनेअंतर्गंत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात येत आहे. असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केल्यापासूनच या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्यात आले

    राज्यातील नांदेड – किनवट , औरंगाबाद – सिल्लोड , पुणे – पुरंदर, ठाणे, भंडारा, गोंदिया, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. तर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अमरावती येथे तर कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी पुणे येथे सहभाग घेतला.

    दरम्यान चंद्रपूर यासह इतर जिल्ह्यातही युवकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाला विद्यार्थी व युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला, अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली.