पर्यटन संचालनालयाच्या कृषी पर्यटन धोरणात होणार सुधारणा, राज्यात कृषी उद्योग आणि पर्यटनाला मिळणार चालना

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने (डीओटी) (DOT) कृषी पर्यटन धोरणात काही महत्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सुधारणांमुळे कृषी (Agriculture) संबंधित उद्योग आणि पर्यटनाला (Tourism) अधिक चालना मिळणार आहे.

    मुंबई : राज्यस्तरीय महाराष्ट्र कृषी पर्यटन (Agricultural Tourism) विकास समितीच्या बैठकीत महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने (डीओटी) (DOT) कृषी पर्यटन धोरणात काही महत्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सुधारणांमुळे कृषी (Agriculture) संबंधित उद्योग आणि पर्यटनाला (Tourism) अधिक चालना मिळणार आहे.

    नियमावलीत सुधारणा
    नव्या सुधारणांमध्ये कृषी जमिनींचा भाडेकरार,परवानग्या, लोगो-नामफलक,कृषी प्रदर्शने,नवीन संधी,उत्पादनाची विक्री आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यासंबंधी नियमावलीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. कृषी पर्यटन प्रशिक्षणासाठी मॉडेल अभ्यासक्रम देखील तयार करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, जिल्हा कृषी अधिकारी, इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सदस्य, तज्ज्ञ कृषी पर्यटन केंद्र मालक आणि पर्यटन विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे हा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. यासाठी एक आढावा बैठक आयोजित करून प्रादेशिक अधिकाऱ्यांना कृषी पर्यटन केंद्रांच्या स्थळभेटी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सहा वेगवेगळ्या प्रादेशिक ठिकाणांहून पाचशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले असे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले.