अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; गावठी दारू निर्मितीचे १२८ अड्डे उद्ध्वस्त

अहमदनगर जिल्ह्यात गावठी दारू निर्मिती व विक्रीविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १२८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२८ आरोपींविरुद्ध कारवाई करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ लाख ८८ हजार ४३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Ahmednagar Crime) केला आहे.

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गावठी दारू निर्मिती व विक्रीविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १२८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२८ आरोपींविरुद्ध कारवाई करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ लाख ८८ हजार ४३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Ahmednagar Crime) केला आहे. पकडण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

    जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, दिनकर मुंडे, सोपान गोरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.