एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची कोठडीतच आत्महत्या; पँटच्या सहाय्याने घेतला गळफास

मुंबईत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकमध्ये पँटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे.

    मुंबई : मुंबईत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यातील लॉकमध्ये पँटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. पवई इथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक करण्यात आली होती. तो पोलीस कोठडीत होता. तिथेच गळफास घेऊन त्याने आयुष्य संपवलं.

    आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल. दरम्यान एअर होस्टेसची हत्या करणारा विक्रम अटवाल हा त्याच बिल्डिंगमध्ये हाऊस किपिंगचं काम करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा रुपलसोबत वाद झाला होता. यावादातूनच त्याने रुपलची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याला अटक करुन पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार होतं. परंतु त्याआधीच आरोपीने गळफास घेतला.

    काय आहे प्रकरण?

    मुंबईत रविवारी (4 सप्टेंबर) 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओग्रेची तिच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. गळा चिरुन तिची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासाच्या आत त्याच इमारतीत काम करणारा सफाई कामगाराला अटक करुन या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीही पवईचा रहिवासी आहे. त्याची पत्नीही इमारतीतील कचरा उचलण्याचे काम करते.

    पवई पोलिसांनी या प्रकरणात विक्रम अटवाल याच्याविरोधात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याची रवानगी अंधेरी पोलीस स्टेशनममध्ये करण्यात आली. इथे कोठडीत असताना त्याने पँटच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं.