बापरे! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली, मुंबईतील हवा आरोग्यास घातक?

सतत वातावरणातील बदल यामुळं हवेतील गुणवत्ता घसरत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून हवेतील (Mumbai Air) गुणवत्तेत घसरण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही हवा आरोग्यास घातक असल्याचं  तज्ज्ञांनी म्हटलंय.

    मुंबई – सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळं हवेत गुलाबी थंडी आहे. पण यावर्षी  म्हणावी तशी अजून थंडीने सुरुवात केली नाहीय. देशपातळीवर विचार करता, उत्तर भारतात म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश व जम्मू काश्मीर आदी शहरांत मोठ्या प्रमाणात थंडीची कुडकुडी आहे. दरम्यान, सतत वातावरणातील बदल यामुळं हवेतील गुणवत्ता घसरत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून हवेतील (Mumbai Air) गुणवत्तेत घसरण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही हवा आरोग्यास घातक असल्याचं  तज्ज्ञांनी म्हटलंय.

    दरम्यान, मुंबईतील पालिकेच्या पी/उत्तर मालाड पश्चिममधील मढ मार्वे ठिकाणच्या कांदळवनांवर बेकायदेशीरपणे आणि धोकादायकरीत्या मोठ्या प्रमाणात भराव टाकून झोपडपट्टया वसवल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणचे कांदळवन नष्ट होत असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने परिणामी हवेतील गुणवत्ताही घसरली आहे. यामुळं ही हवा आरोग्यास धोकादायक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मालाड पश्चिम येथील मढ़-मार्वे भागात मोठया प्रमाणात खारफुटीची जागा आहे.