एअरबस बेलूगा विमानाचं आगमन काल मुंबईमध्ये झालं; बघण्यासाठी विमानतळावर अनेकांची गर्दी

    जगातील सर्वात मोठ्या विमानांपैकी एक असलेले एअरबस बेलूगा विमानाचं आगमन काल मुंबई विमानतळावर झालं आहे. हे विमान बघण्यासाठी आज मुंबई विमानतळावर अनेकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे. एअरबस बेलुगा हे ब्रिझिलीयन विमान निर्मात्याचे ई२ फॅमिलीतील सर्वात मोठे जेट आहे. मुंबईत हे जाऐंट विमान पहिल्यांदाच दाखल झालं आहे. मोठ्या भव्य दिव्य सामानाच्या आयात निर्यातीसाठी  या विमानाचा वापर केला जातो. तरी प्रवासासाठी दाखाल झालेले प्रवासी हे भव्य दिव्य विमान बघून थक्क होत आहेत.

    या भव्य दिव्य विमानाची लांबी 56.15 मीटर असुन उंची 17.25 मीटर आहे. तर विंग स्पॅन 44.24 मीटर आहे. बेलुगा एसटीची अर्ध-स्वयंचलित मुख्य डेक कार्गो लोडिंग सिस्टम पेलोड्सची सहजपणे शक्य होते.