After allegations against Manoj Jarang, Barskar Maharaj expelled from party, Prahar expelled from Jan Shakti Party, Bachu Kadu's big decision

जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. मंगळवारी (दि.20) विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले.

    मुंबई : जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. मंगळवारी (दि.20) विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण विधेयक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तरी देखील आता मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची घोषणा केली. त्यावरूनच मराठा आंदोलनाचे अजय बारसकर यांनी टीका केली. ‘मनोज जरांगे एक नंबरचा नाटकी माणूस’ असे ते म्हणाले.

    मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं होतं. तेव्हापासून त्यांच्याकडून विविध आंदोलने, मोर्च, उपोषण केले जात आहे. असे असताना आता याच मराठा आंदोलनात फूट पडल्याचे दिसत आहे.

    त्यामध्ये बारसकर म्हणाले, मनोज जरांगे यांना पाटील म्हणता येणार नाही. त्यांनी जाहीर केलेला निर्णय कोणाला विचारून घेतला? ते उपोषण करत असले तरी मला मारून टाका, असे ते म्हणणार नाहीत. जरांगेंची खटपट श्रेयवदासाठी आहे. त्यांना कायद्याचं ज्ञान नाही.

    तसेच मोठमोठे हार कोणाच्या पैशांनी घातले जातात. सरकार 15 मिनिटांत अध्यादेश काढू शकतं. जरांगेंना चॅनेलच्या टीआरपीचं  गणितं कळतात. मनोज जरांगे एक नंबरचा नाटकी माणूस आहे. पण त्यांना एक अक्कल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.