बुध्दीमत्तेच्या जोरावर अजयची लंडनला धडक

अजय माणिक पिसे (मोरे) याची परदेशात लंडन (युनायटेड किंग्डम) येथे सिनीयर स्वॉप्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. 21 मे रोजी ते लंडनला रवाना झाले आहेत. अजयला निरोप देण्यासाठी अवघी तरुणाई बसस्थानकावर जमा झाली होती.

    म्हसवड : अजय माणिक पिसे (मोरे) याची परदेशात लंडन (युनायटेड किंग्डम) येथे सिनीयर स्वॉप्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. 21 मे रोजी ते लंडनला रवाना झाले आहेत. अजयला निरोप देण्यासाठी अवघी तरुणाई बसस्थानकावर जमा झाली होती. तर त्याच्या अभिनंदनाचे फ्लेक्स सर्वत्र लावण्यात आल्याने म्हसवड नगरी ही अजयच्या फ्लेक्स ने झाकोळली गेली होती.

    अजय हा लहानपणापासुनच हुशार असल्याने तो मोठेपणी नक्कीच मोठे यश मिळवेल, याची खात्री त्याचे वडील माणिक मोरे यांना वाटत होती. वडीलांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मग अजयनेही अभ्यासासाठी अपार मेहनत घेत प्रत्येकवेळी अव्वल येण्याचा पराक्रम केला.

    कोणाचेही पाटबळ नसतानासुध्दा केवळ बुध्दीमतेच्या जोरावर यश मिळवता येते नव्हे तर परदेशातही जाता येते हेच अजय ने दाखवुन दिल्याने अजयच्या यशाचे युवा वर्गाला खुप कुतुहल वाटत आहे, तर आपणही अजयप्रमाणे यश मिळवत आई – वडीलांचे स्वप्न साकारणार असल्याचे त्याच्या अनेक मित्रांनी त्याला निरोप देतेसमयी सांगितले.